पण मात्र यापुढे हे वाद बांधावरच मिटणार आहेत, यामुळे शेतकऱ्यांचा मौल्यवान वेळही वाया जाणार नाही. कारण वाशिम जिल्ह्यामधील मलेगावांतील गुंज गावात भूमी आलेख विभागाने उपक्रम राबविला आहे.
काय आहे हा पायलट प्रोजेक्ट:
यामध्ये जमीन मोजणी नकाशाला अक्षांश आणि रेखांशाची जोड दिली जाणार आहे. रोव्हर यंत्राच्या साह्याने पीडीएफ नकाशे आपल्या मोबाईलवरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. आणि शेताला जोडल्या जाणारे शेतातून जाणारे रस्त्यांची नोंद सुद्धा सात बारा वर करण्यात येणार आहे. आणि यामुळे शेत मोजणी च्या सबंधातील सर्व कामे एका क्लिकवर होणार आहे आणि शेतकरी खऱ्या अर्थाने एक डिजिटल शेतकरी बनणार आहे.
सरकारने या सेवेसाठी 902 रोवर यंत्र उपलब्ध करून दिले आहेत. याद्वारे आपल्या शेतजमिनीची मोजणी आणि त्याचे नकाशे आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपण अर्ज करावा आणि तात्काळ आपल्याला ती सेवा देण्यात येईल. तसेच नकाशाची प्रत घरपोचही मिळते.
लवकरच ही सेवा सर्व राज्यभरात लागू करण्यात येत आहे.
.jpeg)

0 टिप्पण्या